ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2021 09:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका

शहर : मुंबई

गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्त्वाकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते.

मागे

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर
ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्य....

अधिक वाचा

पुढे  

ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल
ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक....

Read more