ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यातील सर्वात मोठी राजकीय बातमी : महाराष्ट्रात आता मतपत्रिकेचा पर्याय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यातील सर्वात मोठी राजकीय बातमी : महाराष्ट्रात आता मतपत्रिकेचा पर्याय?

शहर : मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत सध्या मतदारांना केवळ ईव्हीएमद्वारे मतदान करता येतं. मात्र ईव्हीएमबाबत असलेल्या शंका आणि तक्रारी लक्षात घेता यापुढे महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर हा कायदा रााज्यत मंजूर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

नागपूर येथील सतिश उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसेच याचिका सादर केली होती. याबाबत नाना पटोले यांनी विधानभवनात आज बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव उपस्थित होते.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधानमंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार  कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीत केल्या. त्यामुळे इच्छेनुरुप, मतदार हे इव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतीलत्यामुळे मतदानानुसार झालेली निवडणूक आणि निकाल, एकंदरीत सर्व प्रक्रिया यावरील जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल आणि मतदानाची टक्केवारी देखील वाढेल, अशी भूमिका पटोले यांनी बैठकीत मांडली.

राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा पर्याय मिळणे हा त्यांचा अधिकार आहेमतपत्रिका अथवा इव्हीएम कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहेहे जनतेला ठरवू दया, यासाठी कायदा करावा अशी मागणी याचिकादार उके यांनी केली होती. जनमानसात या ईव्हीएम कार्यप्रणालीबद्दल साशंकता आहे. त्यामुळे मतपत्रिका या पारंपारिक पद्धतीचा वापर देता येईल का याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

मागे

त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया
त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया

शिवसेनेने कल्याण डोंबवली महापालिका (KDMC Election) निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेल....

अधिक वाचा

पुढे  

शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे
शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे

“पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजील उस्मान....

Read more