By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या ६.७ कोटीवरून ७.२ कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये ३.७९ कोटी पुरुष आणि ३.३९ कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.
Bihar to vote in 3 phases on 28th October, 3rd and 7th November; results on 10th November, announces Election Commission #BiharPolls pic.twitter.com/8KpZBkv0V4
— ANI (@ANI) September 25, 2020
बिहारची विधानसभा निवडणूक कशी पार पडणार?
* कोरोनाची लागण झालेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांना शेवटच्या एका तासात मतदान करता येईल. हे मतदान पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून पार पडेल.
* ८० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटच्या माध्यमतून मतदान करण्याची मुभा.
* राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष शक्य नसल्यास ऑनलाईन अर्जही भरता येणार. डिपॉझिटची रक्कमही ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची मुभा.
* राजकीय नेत्यांना निवडणूक अर्ज दाखल करताना आपल्यासोबत दोनच व्यक्तींना आणण्याची मुभा.
* मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ७ लाख सॅनिटायझर्स युनिट, ४६ लाख मास्क, सहा लाख पीपीई किट, ६.७ लाख फेस शिल्ड, २३ लाख हातमोजे आदी सामुग्रीची व्यवस्था.
* निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो करताना केवळ पाच गाड्यांना परवानगी. प्रचारावेळी सोशल डिस्टन्सिंगची पालन करण्याची सक्ती.
बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल आजपासून वाजणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे न....
अधिक वाचा