By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने सर्वच्या सर्व 243 जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची महाआघाडी आहे. हे सर्व पक्ष एकत्रितपणे भाजप आणि संयुक्त जनता दलाला आव्हान देतील (Bihar Eletions 2020 Mahagathbandhan of RJD Congress left parties list of 243 candidates).जागावाटपाच्या सुत्रानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) 144 जागा, काँग्रेसला 70 जागा आणि डाव्या पक्षांना 29 जागा मिळाल्या आहेत.
Mahagathbandhan including RJD, Congress and left parties releases its list of candidates for all 243 Assembly seats in Bihar.#BiharElections pic.twitter.com/ljB7MuzZDp
— ANI (@ANI) October 15, 2020
याआधी काँग्रेसने आपल्या 49 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यात बांकीपूर येथून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा यांना तिकिट देण्यात आलं आहे. बिहारगंज येथून सुहासीनी यादव यांना तिकिट देण्यात आलं आहे.
Second list of 49 Congress candidates for #BiharElections and one Lok Sabha bye-election for Valmiki Nagar Seat announced: Congress pic.twitter.com/iDQue9Lh6p
— ANI (@ANI) October 15, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाआघाडीसोबतच एनडीएने देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यानुसार जेडीयू 122 आणि भाजप 121 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपने आपल्या कोट्यातील 11 जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला, तर जेडीयूने जीतन राम मांझी यांच्या पक्षाला 7 जागा दिल्या आहेत.
जलयुक्त शिवार योजनेत जनसहभागही होता. आता राज्य सरकार त्याचीही चौकशी करणार ....
अधिक वाचा