By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2020 08:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बिहारच्या निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. यात आज (7 नोव्हेंबर) 78 मतदारसंघांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.96 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी एकूण 55.70 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच एक्झिट पोलमधून जनतेच्या कलाचा अंदाज वर्तवला जात आहे. यात बिहारमधील 63 टक्के लोकांनी सत्ता बदलाला पसंती दिली आहे
इंडिया टुडेच्या चाणाक्य एक्झिट पोलमध्ये बिहारमधील जनतेला बिहारमधील सरकार बदलवणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. याला 63 टक्के नागरिकांनी सरकार बदलण्याचं मत नोंदवलं. तर 27 टक्के लोकांनी सरकार बदलायचं नसून आहे तेच ठेवायचं असल्याचं म्हटलं (Bihar Exit Polls). हा एक्झिट पोल करताना मतदारांना मत देताना कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे हाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 35 टक्के लोकांनी बेरोजगारी हा मुख्य मुद्दा असल्याचं म्हटलं, तर 19 टक्के लोकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. 34 टक्के लोकांनी इतर मुद्द्यांना महत्त्व दिलं.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना रेटिंग देताना 21 टक्के मतदारांनी त्यांना चांगलं म्हटलं, 29 टक्क्यांनी सरासरी म्हटलं आणि 37 टक्के लोकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाईट म्हटलंय.
Tv9 महाएक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125
लोजप – 3 ते 5
अन्य – 10 ते 15
ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131
रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138
टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 116
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120
लोजप – 1
अन्य – 6
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या र....
अधिक वाचा