By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपाठोपाठ एनडीएनेही जागा वाटपावर शिक्कामोर्तब केलं आहे. एनडीएच्या जागा वाटपानुसार जेडीयू बिहार विधानसभेसाठी 122 तर भाजप 121 जागा लढवणार आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. (Bihar polls: BJP gets 121 seats, JD(U) 122)
एनडीएने बिहारमधील काही पक्षांनाही सोबत घेतलं आहे. भाजपने त्यांच्या कोट्यातील 9 जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पार्टीला, तर जेडीयूने जीतनराम मांझी यांच्या एचएएम पक्षाला 7 जागा सोडल्या आहेत. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. दरम्यान, एनडीए आघाडीतून रामविलास पासवान यांचा लोजपा पक्ष बाहेर पडल्याने त्याचा फायदा महाआघाडीला होणार असल्याचं बोललं जातं आहे. पासवान यांनी बिहारमध्ये 143 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. रामविलास पासवान दलित नेते असल्याने तेच एनडीएतून बाहेर पडल्याने नितीशकुमार यांनी निर्माण केलेल्या महादलित व्होटबँकेला सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेआधी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्य प्रभारी भूपेंद्र सिंह यादव उपस्थित होते.
जेडीयू-भाजप पुन्हा साथ साथ
2010मध्ये भाजप आणि जेडीयूने विधानसभा निवडणूक एकत्र लढली होती. त्यावेळी जेडीयूने 141 जागांवर तर भाजपने 102 जागांवर उमेदवार दिले होते. या निवडणुकीत जेडीयू 115vतर भाजप 91 जागांवर विजयी झाले होते. (Bihar polls: BJP gets 121 seats, JD(U) 122)
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसताना ....
अधिक वाचा