By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला संध्याकाळी 7 वाजता होणार असून केंद्रीय मंत्री देखील यावेळी शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बे ऑफ बंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल एंड इकॉनॉमिक कोऑपरेशन'(BIMSTEC)म्हणजेच बिमस्टेक चे नेते उपस्थित राहणार आहेत. बिमस्टेकमध्ये भारत सोबत बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान देश सहभागी आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या शपथ ग्रहण सोहळ्यास पोहोचू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्याजागी बांगलादेश सरकारमधील कोणी वरिष्ठ मंत्री येऊ शकतात. तर शपथ ग्रहण सोहळ्यास पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे शनिवारी रात्री सत्ता स्थापनेचा दावा केला. पंतप्रधान रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींच्या भेटीस गेले. याआधी संध्याकाळी 7 वाजता ते राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) च्या नेत्यांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून एनडीएला 303 जागा मिळाल्या आहेत. 543 मधील 542 जागांवर मतदान झाले. वेल्लोर लोकसभा जागेत पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर मतदान बरखास्त करण्यात आले होते.
अभिनय क्षेत्राक़डून राजकीय विश्वाकडे वळलेल्या अभिवेत्री उर्मिला मातोंडक....
अधिक वाचा