By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज लष्करप्रमुख पदावरुन ते निवृत्त झाले आहेत. जनरल बिपीन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल बिपीन रावत आजच संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारणार असून याआधी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
Delhi: India’s first Chief of Defence Staff General Bipin Rawat receives his farewell Guard of Honour as the Army Chief at South Block. pic.twitter.com/bfpsdbbK1K
— ANI (@ANI) December 31, 2019
Chief of Defence Staff General Bipin Rawat: I wish to convey my best wishes to General Manoj Naravane who will be assuming the office as the 28th Army chief, for a successful innings. pic.twitter.com/u0jyaCWyQX
— ANI (@ANI) December 31, 2019
जनरल बिपीन रावत यांना साऊथ ब्लॉक येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. बिपीन रावत यांना समारोपाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, आव्हानात्मक परिस्थितीतही खंबीरपणे कामगिरीत करणाऱ्या सैनिकांचे आभार मानले. तसंच लष्करप्रमुखपदाची सुत्रे स्विकारणाऱ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
चीफ ऑफ डिफेन्स पद म्हणजे नेमकं काय ?
तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुखपद (चीफ ऑफ डिफेन्स) निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर सर्वात प्रथम विराजमान होण्याचा मान जनरल बिपीन रावत यांना मिळाला आहे. संरक्षणप्रमुख पदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील. संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा विस्तार अखेर सोमवारी पार पडला. राज....
अधिक वाचा