ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच;पदरी पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच;पदरी पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय

शहर : मुंबई

मोदी सरकारच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. यंदा शिवसेनेच्या वाट्याला चांगले खाते येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेच्या गळ्यात मारले आहे. केंद्रातील इतर खात्यांच्या तुलनेत अवजड उद्योग मंत्रालय कमी प्रतिष्ठेचे मानले जाते.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते. शिवसेनेने याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले होते. याची परिणिती युती तुटण्यात झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवेळी भाजपच्या नेतृत्त्वाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. यंदा शिवसेनेला सत्तेत चांगला वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज जाहीर झालेल्या खातेवाटपानंतर सेनेच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी गुरुवारी मंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेची नाराजी समोर आली होती. शिवसेनेकडून भाजपसमोर तीन मंत्रिपदे, राज्यपाल पद आणि उपसभापती अशा पाच पदांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अरविंद सावंत यांच्या रुपाने शिवसेनेला एकच मंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेला किमान आणखी एक मंत्रीपद मिळायला हवे, अशी खंतही बोलून दाखवली होती.

मागे

पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर मोदी पहिलाच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर मोदी पहिलाच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच....

अधिक वाचा

पुढे  

दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका
दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस आणि र....

Read more