By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. मात्र, सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे आता मनोहर जोशी असं का बोलले आहेत याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई - नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेने काल लोकसभेत समर्थन दिले. त्यामुळे ....
अधिक वाचा