By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 07:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपने नवी जबाबदारी टाकली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
बिहार निवडणूक तारखांची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांनाही वेग आला आहे. भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसंच बी.एल.संतोष यांच्यासोबत बिहारच्या प्रमुख भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांना अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं.
प्रभारीपदी नियुक्ती होताच बिहार जिंकण्याचा फडणवीसांचा इरादा
देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं म्हणत यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल”, असा दावा फडणवीस यांनी केला.
लवकरच युतीची घोषणा, भूपेंद्र यादवांची माहिती
बैठक संपताच वरिष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी पुन्हा एकदा एनडीए बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच “नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारची जनता एनडीएसोबत आहे. यापुढचे दोन-तीन दिवस आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. लवकरच युतीची घोषणा केली जाईल”, असं भूपेंद्र यादव यांनी सांगितलं.
“भाजप, जेडीयू आणि एलजेपी मिळून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. यावेळेस जीतनराम मांझी यांचा पक्ष देखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमची ताकद निश्चित वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणूक एनडीए नक्कीच बहुमताने जिंकेल”, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.
“योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्....
अधिक वाचा