By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 16, 2019 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भाजपनेही 'महाजनादेश' यात्रेच्या माध्यमातून पक्षाची हवा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच आता प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपची मुंबईत प्रचार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटनमंत्री यांच्यासह प्रचार समिती मधील 20 हजार पेक्षा जास्त सदस्य सहभागी होणार आहेत.
या बैठकीत संघटनेबाबत नवीन ध्येय धोरणे, नव्याने कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना सक्रिय बनवणे जनतेपर्यंत पक्षाचे कार्य पोहोचविणे आदींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमधील 370कलम हटवल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानने आता भारतात नि....
अधिक वाचा