By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bhopal
कर्नाटकमध्ये कॉंग्रेस-जेडीस सरकारला सुरुंग लावल्यानंतर मध्यप्रदेशातही कॉंग्रेसला सतेवरून खाली खेचल्याची रणनीती भाजपाने आखल्याची चर्चा होती. परंतु भाजपाचा हा डाव फसल्याचे सध्यातरी चित्र आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला काठावरच बहुमत आहे. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायदा विधेयकावर झालेल्या मतदानात भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षादेश डावलून कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान केले. सरकारच्या बाजूने 122 मत पडली.
भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी ही बंडखोरी केली. खरे तर ते मूळचे कॉंग्रेसचेच आहेत. तथापि त्यांनी अद्याप भाजपचा राजीनामा दिला नाही. तेव्हा त्यांच्या या बंडखोरीवर भाजप काय कारवाई करते? ते पाहावे लागेल.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपण ....
अधिक वाचा