ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

vidhansabha 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

vidhansabha 2019 :  भाजपची पहिली यादी जाहीर

शहर : मुंबई

भाजपकडून विधानसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीमधून 125 उमेदवारांची नावे घोषित केली. यामध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, साताऱयातून शिवेंद्रराजे, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस, सातारा- शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत दादा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवी दिल्लीत आयोजित भाजपाच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली.

भाजपाच्या या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले. यामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण कराडमधून अतुल भोसले, रावेर हरिभाऊ जावळे, कर्जत जामखेड राम शिंदे, परळीतून पंकजा मुंडे, दहिसरमधून मनीषा चौधरी यांची नावे जाहीर झाली आहेत.या यादीत एकनाथ खडसे विनोद तावडे यांसारख्या काही मोठ्या नेत्यांची नावे आलेली नाहीत.

मागे

साताऱ्यात महाराज विरुद्ध ...
साताऱ्यात महाराज विरुद्ध ...

सातारा लोकसभा मतदारसंघ सातार्‍याचे राजे उदयन राजे भोसले यांनी राजीनामा द....

अधिक वाचा

पुढे  

Vidhansabha 2019 : शिवसेनेचीही यादी जाहीर
Vidhansabha 2019 : शिवसेनेचीही यादी जाहीर

भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. शिव....

Read more