By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : srinagar
पुलवामा हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर त्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांची भाजप नेत्यांनी भेट घेतली. मात्र, छत्तीसगडमध्येही माओवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना तर मोदी कधी भेटल्याचे ऐकले नाही.हे जरा संशयास्पद आहे असा निशाणा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी भाजपवर साधला. तसेच भाजपला 'बालाकोट'मुळे 'राम मंदिरा'च्या मुद्द्याचा विसर पडला आहे,' असे एका सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे. 'आधी भाजपला राम मंदिर मुद्दा फार महत्त्वाचा वाटत होता. आता तो गेला कुठे? 'बालाकोट'ने गिळला का,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिवसैनिकांच्या तीव्र रोषामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोम....
अधिक वाचा