ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्याप्रमाणे केंद्रात सत्ता दिली. त्याप्रमाणे जनता राज्यात भाजपला पुन्हा सत्ता देणार - मुख्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 01, 2019 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्याप्रमाणे केंद्रात  सत्ता दिली. त्याप्रमाणे जनता राज्यात भाजपला पुन्हा सत्ता देणार - मुख्यमंत्री

शहर : navi Mumbai

राज्यातील जनतेची उरलेली कामे पुढील तीन महिन्यांत  पूर्ण करू. मात्र, ही कामे जर तीन महिन्यात पूर्ण झाली नाही तरी, ज्याप्रमाणे जनतेने केंद्रात भाजपला सत्ता दिली. त्याप्रमाणे राज्यातदेखील देणार आहेत, असा विश्वास व्यक्त करताना पुन्हा सत्ता आल्यावर ही कामे पूर्ण करण्यात येतील, मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले. ते नवी मुंबई उत्सव कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थातर्फे नवी मुंबई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक प्रचाराला अनौपचारीक सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाच वर्षांच्या कार्यअहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि मंदा म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले.  

मुख्यमंत्र्यांनी या उत्सवात शंकर महादेवन यांच्या गाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी ११ लाख रुपये मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आले. तसेच प्रसिध्दी गायक संगीतकार पडमश्री शंकर महादेवन आणि वाशी खाडीत बुडणाऱ्यांचे जीव वाचवणारे मच्छिमार महेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.

 

मागे

दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका
दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस आणि र....

अधिक वाचा

पुढे  

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्....

Read more