By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवान हालचाली करत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा भाजप सरकार येईल असं म्हटलं आहे. भाजपकडे 119 आमदारांचे समर्थन असल्याचा दावाही त्यांनी केली. महाशिवआघाडीच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर भाजप सरकार कसं स्थापन करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात राज्यपालांची भेट घेणार आहे. सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा होत असली तरी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे वेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर सर्व अवलंबून आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सरकार स्थापनेसाठी 145 चा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. कोणत्याही पक्षाने त्यांच्याकडे 145 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांकडे सोपवलं की सरकार स्थापनेचा दावा करता येईल. सध्या शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचे पर्याय ठेवलेले नाहीत. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करायचे असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हाच.
चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे की, भाजपला निवडणुकीत 105 जागा मिळाल्या होत्या. पण सध्या त्यांच्याकडे अपक्ष आमदारांसह एकूण 119 आमदारांचा पाठिंबा आहे. ते म्हणाले की, भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्याकडे अपक्षांसह 119 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजप या संख्याबळावर सरकार स्थापन करेल. आम्ही राज्यातील सर्व राजकीय हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीत युती केलेल्या भाजप-शिवसेनेला 161 जागा मिळाल्या. ते दोघेही सहज सरकार स्थापन करू शकले असते. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेमुळे शिवसेने-भाजप यांच्यात बिनसलं. अखेर शिवसेनेनं ठाम भूमिका घेत केंद्रातील रालोआ आघाडीमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारला पाठिंबा देण्याबाबत आघाडीमध्ये एकमत नाही. तसंच त्यांच्यात चर्चा होत असली तरी त्यातही तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. तसेच सेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याने तेसुद्धा आव्हान आहे. दुसऱ्या बाजूला भाजपसोबत चर्चेला सेना तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पर्याय भाजपसमोर आहे. तसेच भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा रंगला आहे. भाजप....
अधिक वाचा