ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट

शहर : मुंबई

भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला.

अनंत कुमार हेगडे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस (फडणवीस) 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांना राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन  हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला, असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.

इतकंच नाही तर भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. यासाठीच हे ठरवण्यात आलं की त्यासाठी एक नाटक रचावं लागेल. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला, असा दावाही अनंतकुमार हेगडे यांनी केला.

तो व्हायरल मेसेज खरा?

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत आहे. देवेंद्र फडणवीसांनी शपथ का घेतली, याबाबत या मेसेजमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. मात्र हा मेसेज खरा की खोटा याबाबत स्पष्टता होऊ शकत नाही. मात्र अनंत कुमार हेगडे यांच्या गौप्यस्फोटाने तो व्हायरल मेसेज खरा आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलं आहे?

महाराष्ट्रात अजित पवारांना हाताशी धरताना भाजपकडून बहुमताची गणितं फसली किंवा चूक झाली, असं तुम्हाला वाटत असेल. पण तो एक सुनियोजित आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. का ? हे वाचा.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला आहे. केंद्र, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार या निधीवर नियंत्रण ठेवतात. जपानची इच्छा नसली, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळवायचा होता. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी जपान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द होईल. आणि काँग्रेसला कर्जमाफीच्या नावाखाली निधी काढून घेण्यास मदत होईल.

22 नोव्हेंबरपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यांना ही रक्कम केंद्रीय निधीत हस्तांतरित करता आली नव्हती. म्हणून त्यांनी अजित पवार (अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा गेम प्लॅन) यांच्याशी करार केला आणि 159 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं दिली. म्हणून घाईगडबडीत हा शपथविधी उरकण्यात आला.

फडणवीसांनी जवळजवळ सर्व रक्कम केंद्राच्या तिजोरीत वर्ग केली आहे. यामुळे नवीन सरकारला निधीला स्पर्श करणं अशक्य झालं आहे. फडणवीसांनी राजीनामा दिला, पण त्यांना काँग्रेसला बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखता आलं.

सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये धरलेला आग्रह हा शेतकरी कर्जमाफीचा असला (कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच घोटाळा करण्याचा सर्वात सोपा मार्ग) तरी त्यामागे मोदींचं महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं स्वप्न रोखण्याचा उद्देश होता.

अजित पवारांना याची कल्पना नव्हती आणि त्यांना वाटलं की आपण उपमुख्यमंत्री होऊ शकतो. तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर सोपवलेलं निर्धारित काम पूर्ण केलं, असं व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

मागे

फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा, मंत्रालयात बैठक
फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा, मंत्रालयात बैठक

देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यास....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री?
अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन काही दिवस उलटल्यानंतरही अद्य....

Read more