ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीक

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (30 जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री पुणे जिल्हा आणि विभागाचा कोरोनाचा आढावा घेणार आहेत. मात्र, “मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. “पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक करता 500 कोटींची मदत जाहीर करावी”, असा घणाघात जगदीश मुळीक यांनी केला.

पुण्यात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात 50 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितरुग्ण आढळले आहेत. मात्र, पुण्यात बेडसुद्धा उपलब्ध होत नाहीत. सरकारने योग्य पद्धतीने पुण्याची परिस्थिती हाताळली नाही. मुख्यमंत्र्यांचं पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.

पालकमंत्री अजित पवार बैठका घेत आहेत. मात्र, पुण्यात नियोजनपद्धतीन काम करण्याची गरज आहे. राज्य सरकार पुण्याची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, असा आरोप मुळीक यांनी केला.

सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन धीर देणं गरजेचं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजून काढलं. त्यामुळे लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्याचं वाटतं, असं जगदीश मुळीक म्हणाले.

मागे

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार
महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भा....

अधिक वाचा

पुढे  

भाजपच्या तोंडाला रक्त लागलंय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सह
भाजपच्या तोंडाला रक्त लागलंय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सह

राजस्थानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री....

Read more