ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक २०१९ : प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक २०१९ : प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान

शहर : देश

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर नेत्यांची एकमेकांवरच्या टीप्पणी जोरात सुरू आहे. एकमेकांवर वेगवेगळे आरोप करणं आणि चिखल उडवणं हे तर नेहमीचच झालंय. नेते आपण किती आणि काय कामं केलीत यापेक्षा विरोधी उमेदवार कसा योग्य नाही हे सांगण्यात जास्त धन्यता मानत आहेत. यावेळी, आपली पायरी सोडून विरोधी उमेदवारावर आक्षेपार्ह वक्तव्य करतानाही अनेक नेते दिसत आहेत. याच यादीत आता भाजप नेते जयकरण गुप्ता यांचंही नाव जोडलं गेलंय.

 

मेरठमध्ये झालेल्या एका निवडणूक सभेदरम्यान भाजप नेते जयकरण गुप्ता यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'काँग्रेसचे एक नेते जोर-जोरात विचारतात, अच्छे दिन आले? त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत... स्कर्ट परिधान करणारे आज साडी परिधान करून मंदिरात डोकं टेकवायला लागल्या... गंगाजलपासून दूर पळणारे लोक आज गंगाजलाचं आचमन करायला लागले...' असं म्हणत त्यांनी आगपाखड केली.

निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आपली मर्यादा विसरून वक्तव्य करण्याची नेत्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या संभलचे समाजवादी पक्ष जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अभद्र टिप्पणी केली होती. 'रामपूरमध्ये संध्याकाळ रंगीन होतील... रामपूरचे लोक माशाअल्लाह चांगले आहे, सभ्य आहेत कारण आझम खांनी यांची इतकी कामं केली आहेत... त्यामुळे लोक मतं तर समाजवादी पक्षालाच देतील. पण, मजा लुटण्यासाठी ते कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. कारण त्यांना एकदा संधी मिळालीय आणि ते हेच करतील.. मेरे पैरों में घुंघरू बांध तो फिर मेरी चाल और ठुमके देख लो' असं म्हणत आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांनी जयाप्रदा यांना निशाण्यावर घेतलं.

सपा जिल्हाध्यक्षांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं त्यांनी नोटीस धाडलंय. प्रकरण गंभीर होतंय हे लक्षात घेऊन ह्यातनगर पोलीस स्टेशनमध्ये फिरोज खान यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर महिला आयोगानंही त्यांना नोटीस धाडलीय.

मागे

देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य
देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य

काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही,राज्यघटनेतील कलम ३२९ मध्ये तरतूद
निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही,राज्यघटनेतील कलम ३२९ मध्ये तरतूद

एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप क....

Read more