ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरे सरकार आणि आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांची लोकायुक्तांकडे याचिका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरे सरकार आणि आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांची लोकायुक्तांकडे याचिका

शहर : मुंबई

शिवसेनेचे मदार प्रताप सरनाईक आणि ठाकरे सरकारविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. 53 पानी याचिकेसोबत सर्व पुरावेही दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. 2004 मध्ये बांधण्यात आलेलं विहंग गार्डनमधील दोन इमारती अनधिकृत आहेत. या इमारतीला अजून OC मिळालेली नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. आता त्यांनी या दोन्ही प्रकरणात लोकायुक्तांकडेच याचिका दाखल केली आहे.(Kirit Somaiya’s petition against CM Uddhav Thackeray and Pratap Sarnaik to Lokayukta)

प्रताप सरनाईकांवरील सोमय्यांचा आरोप काय?

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने 2004 साली बांधलेल्या विहंग गार्डनच्या दोन इमारती अजून अनधिकृत आहेत. या इमारतींना अद्याप OC मिळालेली नाही. गेल्या 13 वर्षांपासून प्रताप सरनाईक यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. त्यांनी 11 कोटीच्या बदल्यात 25 लाक रुपये दंड भरला आहे. या प्रकरणात भाजपने हस्तक्षेप केल्यानंतर आता आता ठाणे महापालिकेनं त्यांची फाईल रोखली आहे. मात्र, ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.

बुधवारी अलिबागमध्ये भाजपचं आंदोलन

त्याचबरोबर उद्या अलिबागला भाजप आंदोलन करणार असल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोरलाई जमीन व्यवहाराची चौकशी करा, या मागणीसाठी हे आंदोनल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सोमय्या यांनी या जमीन व्यवहार प्रकरणात 1 फेब्रुवारीला कर्जत तहसीलदार यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे.

रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केलंय. कर्जत तहसील कार्यालयात माहितीच्या अधिकारात चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली.

 

मागे

अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर…, सामनातून टीकेचे बाण
अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर…, सामनातून टीकेचे बाण

स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या ....

अधिक वाचा

पुढे  

काश्मिरी नेता जेव्हा महाराष्ट्रातून लोकसभा लढवतो आणि निवडूनही येतो…वाचा पवारांनी सांगितलेली राजकीय..
काश्मिरी नेता जेव्हा महाराष्ट्रातून लोकसभा लढवतो आणि निवडूनही येतो…वाचा पवारांनी सांगितलेली राजकीय..

गुलान नबी आझाद हे काँग्रेसमधील गांधी परिवारानंतर घेतलं जाणारं मोठं नाव आहे....

Read more