By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 10:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू आणि नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवु नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल' अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. रविवारच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपूत्रांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बेडूक म्हणून उल्लेख केला.
याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. 'इतकीवर्ष साहेबांकडून पाहून गप्प बसलो. पण राणे कुटुंब, भाजपावर आगपाखड केली, तर ३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिलं, अनुभवल तरे सारं बाहेर येईल असा इशाराच राणेंनी दिला. निवडणुकीच्याआधी हिंदुत्व मुख्यमंत्री बनताना सेक्युलर हे गांडूळसारख झालं.
'सरकार पाडायचं काय, ते पडतच आलंय', असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
राज्य चालवताय तर मग उत्पन्न वाढवा. नैसर्गिक आपत्तीत केंद्रानं मदत द्यायलाच हवी, असं देखील काही नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काल जीएसटीचा निर्णय चुकला असं म्हटलं. त्यावर राणे म्हणाले की,' जीएसटी देणार, उशीर होईल पण देणार'.
कोरोनामुळे शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सा....
अधिक वाचा