ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका, महाराष्ट्रात 60 दिवसांत 1 हजार सभा

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका, महाराष्ट्रात 60 दिवसांत 1 हजार सभा

शहर : मुंबई

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार महाराष्ट्रात घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

केशव उपाध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही 75 पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील.

तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

राज्यातील या नेत्यांशिवाय राष्ट्रीय पातळीवरील भाजपा नेते राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. तसेच शहर आणि तालुका पातळीवर गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये यांनी सांगितले. 
 

 

मागे

"हार्दिक पटेल यांना मोठा धक्का, लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही"

काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोक....

अधिक वाचा

पुढे  

आमचा नेता एकच आहे, तुमच्याकडे कोण आहे - उद्धव ठाकरे
आमचा नेता एकच आहे, तुमच्याकडे कोण आहे - उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकदिलाने लढणार आहेत. पंतप्रधानपदासाठी आ....

Read more