ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात भाजपाचं एक स्वप्न होतं,अखेर मोदीचं हे स्वप्न भंगलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 03:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात भाजपाचं एक स्वप्न होतं,अखेर मोदीचं हे स्वप्न भंगलं

शहर : baramati

महाराष्ट्रात भाजपाचं एक स्वप्न होतं, अखेर ते भंगलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही इच्छा व्यक्त केली होती, पण राजकारणात लोकमतापुढे कुणाचंही चालत नाही. भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटत असताना, हे स्वप्न पूर्ण होवू शकलं नाही. अनेक जण भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होईल का याकडे डोळे लावून बसले होते, पण यात अखेर भाजपला अपयश आलं आहे.महाराष्ट्राची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खुद्द एका सभेत बोलून दाखवलं होतं की, दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाची बैठक होती, या बैठकीला मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यावेळी रात्रीचे वाजले असावेत, बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी चंद्रकांतदादा आणि मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं.नरेंद्र मोदी यांनी चंद्रकांतदादा यांना आवाज देत, दादा इधर आओ, असं म्हणत बिटीया गिरनी चाहिए, असं सांगितलं. बिटीया म्हणजे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला पाहिजे, असं नरेंद्र मोदी यांना म्हणायचं होतं, असं चंद्रकांतदादा यांनी हा किस्सा सांगताना स्पष्ट केलं.

पण अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या लाखापेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. मात्र दुसरीकडे अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात दारूण पराभव झाला आहे.

 

मागे

Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का
Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का

कोकणातील रायगड या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना विजयी घोष....

अधिक वाचा

पुढे  

Election Results 2019: पार्थच्या दारूण पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Election Results 2019: पार्थच्या दारूण पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या पराभवानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँ....

Read more