By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 03:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मध्य प्रदेशात राजकीय संकट दिसून येत आहे. बहुमताची चाचणी तात्काळ घेण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायलाने लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याचे द्यावेत आदेश, अशी मागणी शिवराजसिंह यांनी केली आहे.
विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित
देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केल्याने आता कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी १० दिवसांचा वेळ मिळाल आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले.
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर कमलनाथ सरकारवर संकट ओढवले होते. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बहुमच चाचणीची मागणी करण्यात आली. मध्य प्रदेशात राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्य....
अधिक वाचा