By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 03:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
दोन दिवसांपूर्वी आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं गौतम गंभीर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर फोन करून त्यांना ही धमकी देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी कली आहे. पोलिसांनीही या घटनेची गंभीर देखल घेतली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये गौतम गंभीर हे दिल्ली (पूर्व) येथून निवडून आले होते. काँग्रेसने या ठिकाणाहून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर आम आदमी पक्षानं आतिशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. गंभीर यांनी लवली यांचा ३.९३ लाखांच्या फरकानं पराभव केला होता. तर आतीशी यांना केवळ २ लाख मतं मिळाली होती.
नवी दिल्ली - नागरिकत्व संशोधन कायद्यावरून (CAA ) सुरू असलेल्या ....
अधिक वाचा