By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 10:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना, भाजपने मेगाप्लॅन केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपने थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. संसद भवनात होणाऱ्या या भेटीत महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा होणार आहे.
एकीकडे ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा होणार असली, तरी दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीला मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत केल्यास, राष्ट्रवादीला राज्यात आणि केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदं देण्यात येतील. शिवाय शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपद मिळू शकतं.
भाजपची राष्ट्रवादीला ऑफर?
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करावी यासाठी शरद पवारांवर राष्ट्रवादीच्याच दोन खासदारांचा दबाव आहे. शिवाय अजित पवारांचेही मन वळवण्याचे प्रयत्न या दोन खासदारांकडून सुरु आहेत. भाजपसोबत सत्तेत गेल्यास, केंद्रात तीन मंत्रिपदे, राज्यातील सत्तेत मोठा वाटा आणि जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद असा फॉर्म्युला भाजपने राष्ट्रवादीला ऑफर केल्याची माहिती, टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे.
दरम्यान, भाजपने ऑफर दिल्याची माहिती समोर येत असली, तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. मात्र शरद पवार यांची हल्लीची काही विधानं पाहिली तर संभ्रमात टाकणारी आहेत.
अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या ....
अधिक वाचा