By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 05:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - एकनाथ खडसे काँग्रेस पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने आमचे आमदार फुटण्याची काळजी करू नये. याऐवजी त्यांनी स्वत:च्या आमदारांची चिंता करावी. भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. जनतेला नाथाभाऊंची होत असलेली अवहेलना काही आवडलेली नाही.
काँग्रेसने अद्याप खडसे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र, एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आमचे पंकजा यांच्याशी संबंध आहेत. आम्हाला त्यांच्या नाराजीचे कारण ठाऊक नाही. मात्र, भाजपने त्यांची नाराजी कशी दूर करता येईल, याचा वेळीच विचार करावा, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
मुंबई - राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच महिलांवर होणा....
अधिक वाचा