By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 27, 2019 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
भाजपचे सरकार देशात पुन्हा येईल आणि मोदी पंतप्रधान होतील अशी जाणीव काँग्रेसला झाल्यानेच त्यांचा तिळपापड होत आहे. म्हणूनच काँग्रेसकडून आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत केली आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याने काँग्रेससमोर मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे दिशाहीन झालेलं काँग्रेस नेतृत्व मोदींवर आणि भाजपवर बेछूट आरोप करत आहे. निरव मोदी आणि मल्ल्या काँग्रेसच्या काळातच या लोकांना पैसे दिले गेले होते. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ते देशात होते. मात्र मोदी सरकार आल्यानंतर आपल्यावर कारवाई होईल या भीतीने हे सर्व पळून गेले. या सर्व भगोड्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगत काँग्रेस आता आपलं पितळ उघडे पडेल या भीतीने ग्रासले आहे. यामुळेच ते भाजपला लक्ष्य करत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कायम दुट्टप्पी भूमिका घेतात. श्रीनिवास व....
अधिक वाचा