By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 10:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. आता त्यांचे संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे सरकार देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी हे सरकार घालवणे आवश्यक आहे. देशासाठी जे बलिदान द्यावे लागेल, ते देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. लोकसभा निवडणुकीत आपण सर्व विरोधी पक्षांनी जशी एकजूट दाखवली, तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून देशापाठोपाठ राज्यातील भाजपा युतीची सत्ता संपवून टाकू, असा निर्धारही पवार यांनी केला.
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे सावरकर चौकाजवळ मेडतिया मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी पवार येथे आले होते. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, अमर राजुरकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.
काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटाबंदी केली. काळा पैसा सामान्यांकडे नसतो तर मोठ्यांकडे असतो. पैसा काढला तो सामान्यांचा. मोदींना स्वीस बँकेतून अजून पैसा आणता आला नाही, असे पवार म्हणाले. जीएसटी आणून देशातील लहान व्यापाºयांना मोदींनी संकटात टाकले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींना पाठिंबा दिला, तेच दु:खी आहेत. तीच अवस्था उद्योग क्षेत्राची आहे. काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत उद्योग वाढवले नाहीत. त्याचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या रोजगाराला बसला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील भाजपचा दहशतवाद रोखण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनी काय खायचे, काय बोलायचे हे सरकारच ठरवत आहे. याच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो. भाजपच्या दहशतवादापासून देश मुक्त करणे गरजेचे आहे.
‘शेतकºयांंसाठी ठोस धोरण नाही’
पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.
महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती ....
अधिक वाचा