ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 14, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे

शहर : देश

या वर्षाच्या शेवटापर्यंत तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. या तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे असणार आहे. अमित शाह केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री झाल्यानंतर पार्टी आता नवा अध्यक्ष शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण सध्या तरी या चर्चांना पुर्णविराम मिळाले आहे.

भाजपा पुढच्या काही दिवसांत सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरु करणार आहे. पार्टीचे संस्थापक सदस्य राहिलेल्या विचारक श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती 6 जुलैला हे काम सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. साल 2014 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. तर झारखंडमधअये 2014 नोव्हेंबरमध्ये झारखंडमध्ये निवडणुका झाल्या होत्या. अमित शाह यांनी तिन्ही राज्याच्या भाजपा प्रमुखांसोबत निवडणूक रणनिती संदर्भात बैठक केली आहे.

 

मागे

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दावेदारीमुळे शिवसेनेतील ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता
आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दावेदारीमुळे शिवसेनेतील ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता

युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव अचानकपणे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल....

अधिक वाचा

पुढे  

प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू?
प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू?

एम. पी. मिल कंपाऊंड एफएसआय घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरवलेले राज्याचे ग....

Read more