ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी म्हटले की, राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल. भाजपशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे शक्य नाही. सर्व आमदारांना सत्तास्थापनेवेळी मुंबईत बोलावू, पण सध्या लोकांमध्ये जाऊन काम करा, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला.

या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आमदारांना मार्गदर्शन केले. एकूणच भाजप नेते आपल्या आमदारांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसले. यावेळी एका प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषणही करण्यात आले.

दादरच्या वसंतस्मृती येथील कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपप्रणित आघाडीतील घटकपक्षांचे नेते आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार उपस्थित होते.

मागे

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तातडीने सुरु करा : धनंजय मुंडे
मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तातडीने सुरु करा : धनंजय मुंडे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- संजय राऊत
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

फॉर्मुलाची चिंता करु नका, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास शिवसेन....

Read more