ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप देणार ‘लाव रे तो व्हिडिओ’ ला उत्तर - विनोद तावडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप देणार ‘लाव रे तो व्हिडिओ’ ला उत्तर - विनोद तावडे

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका करून त्यांना हरवा, असे आवाहन करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आता भाजप त्यांच्याच भाषेत उत्तर देणार आहे. राज ठाकरे यांचे काही जुने व्हिडिओ भाजप आयटी सेलने तयार केले असून २७ एप्रिलला ‘लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप राज यांच्या सर्व आरोपांना सप्रमाण उत्तर देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले. तसेच मनसे आणि पाकचा काय संबंध आहे, याची माहिती मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी मंगळवारच्या सभेत योगेश चिले यांच्या कुटुंबीयांचे चित्र भाजपने त्यांना न विचारता फेसबुकवर टाकून प्रचार केल्याचे सांगितले होते. त्याबाबत तावडे म्हणाले, ते भाजपचे अधिकृत फेसबुक पेज नाही. एका चाहत्याने ते फेसबुक पेज तयार केले आहे. खरे तर असा फोटो टाकणेही चुकीचेच आहे. परंतु राज ठाकरे यांनी ज्या फोटोचा उल्लेख केला तो ६ वर्षांपूर्वीचा आहे. न्यूयॉर्क टाइम्ससाठी संबुद्ध मित्र मुस्तफी यांनी भारतातील मध्यमवर्गीय कसे पुढे येत आहेत यावर एक लेख लिहिला. त्यात त्यांनी चिले यांची मुलाखत घेऊन त्यांचा फोटो छापला आहे. त्यानंतर हाच फोटो पाकिस्तान डिफेन्स या वेबसाइटवरही त्याच लेखासोबत दिलेला आहे. अर्थात त्या वेबसाईटचा पाकिस्तानच्या संरक्षण विभागाशी काहीही संबंध नाही किंवा ती त्यांची अधिकृत वेबसाइटही नाही. परंतु पाकच्या त्या वेबसाइटवर हा लेख कसा तसेच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदीच पंतप्रधान व्हावे असे म्हटले, त्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काहीही म्हणत नसताना राज ठाकरे मात्र प्रश्न उपस्थित करत आहेत.

मागे

चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे
चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या ....

अधिक वाचा

पुढे  

वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या रोड शो सुरू
वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या रोड शो सुरू

लोकसभा निवडणूकीच्या वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेगा रोड शो सु....

Read more