By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले होते की, राज्याला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्ताधार्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला पक्ष असला हवं. खरं तर भाजपला राखण्यासाठी आणि भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी मतदारांना त्यादृष्टीने आवाहन केले होते. पण मनसेचा फक्त एकच उमेदवार विजयी झाला. त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष असावा, हे राज ठाकरेंचे स्वप्न अपूर्णच राहिलं, असं वाटतं होतं. परंतु शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी भाजपवर आली आहे.
कारण महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये आता भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष राहणार आहे. भाजपचं विधिमंडळात १०५ संख्याबळ आहे. या पक्षातही अनुभवी नेते आहेत. यापूर्वीही त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची जी गेल्या पाच वर्षात उणीव भासत होती. ती भरून काढण्याची जवाबदारी भाजपला पार पडावी, लागणार आहे. साहजिकच तीन प्रमुख पक्षाच आघाडी सरकार विरूद्ध भाजपा असा सामना विधानसभेत पाहायला मिळू शकतो.
राजकारण कसे धक्के देते याचा अनुभव यावेळी तमाम महाराष्ट्राने गेला महिनाभर घ....
अधिक वाचा