By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
जळगाव - राज्याचं लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला आहे. भाजपने 34-30 असा विजय मिळवत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून रावेरच्या रजनी पाटील तर उपाध्यक्षपदी लालाचंद पाटील हे विजय झाले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व सिद्ध झालं आहे.
या विजयानंतर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकमेकांना पेढा भरवून, आपल्यात कोणतीही कटूता नाही असं स्पष्ट केलं. तसंच जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रच काम करत असतो, असंही खडसे आणि महाजन यांनी सांगितलं.
“जळगाव जिल्हा परिषदेत भाजपला 34 मतं मिळाली, तर महाविकासआघाडीला 30 मतं मिळाली आहेत. एकंदरीत घवघवीत असं यश भाजपला मिळालेलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बोलबाल केला की आम्ही सारे एकत्र आहोत त्यामुळे आमचा विजय नक्की असं त्यांनी घोषीत केले होते. पण त्यावर मात करुन भाजपने स्वबळावर चांगलं असं यश मिळवलं”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
बहुमतासाठी 34 जागांची आवश्यसक होती. यामध्ये भाजपला ३३, काँग्रेसला ०४, शिवसेना १४ तर राष्ट्रवादीला १६ अशा जागा मिळाल्या. जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ६७ जागा होत्या व त्यात भाजपने आपला गड कायम राखला.
“कुणी कितीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी भाजपचे मतदार हे ठाम आहेत. उलट आमचे या ठिकाणी 32 होते त्यांचे दोन येऊन आम्हाला मिळाले. आणखी थोडावेळ मिळाला असता तर तीन-चारजण येऊन मिळाले असते पण ते पोहोचू शकले नाही, असंही यावेळी खडसेंनी सांगितले.
जळगाव जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याची शक्यता होती. या निवडणुकीपूर्वी भाजप काँग्रेसच्या साथीने सत्तेत होती. मात्र राज्याचं राजकारण बदलल्यानंतर, महाविकास आघाडी एकत्र आली.
जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फड....
अधिक वाचा