ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

शहर : देश

भारतीय जनता पार्टीला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर आणि देशभक्तीच्या भावनेवर भाजपा सशक्त उभी आहे. भाजपाचे कार्यकर्ते नेहमीच देशवासियांची मदत करण्यासाठी पुढे असतात. आपल्या विकासाने पार्टीला सर्व स्तरात लोकप्रिय बनवलं आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस 6 एप्रिल 1980 मध्ये करण्यात आली होती. गेल्या 38 वर्षामध्ये पहिल्यांदाच 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमतात केंद्रात सरकार स्थापन केले. यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. 1977 मध्ये जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली जनसंघाच्या अनेक दलाचे विभाजन झाले आणि जनता पार्टीचा उदय झाला. जनता पार्टीने 1977 मध्ये काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकू शकले नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर जनता दलात फूट पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. 1980 मध्ये जनता पार्टीचे विलनीकरण करुन भारतीय जनता पार्टी नाव ठेवण्यात आले. भाजपाचे युगपुरुष अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष होते. लालकृष्ण आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य होते. भाजपाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यास मुरली मनोहर जोशी आणि माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.

मागे

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जाहिरातींवरच जास्त खर्च  - पवार
मोदींनी अनेक योजना आणल्या पण जाहिरातींवरच जास्त खर्च - पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीक....

अधिक वाचा

पुढे  

आडवाणींबाबतच्या वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी राहुल गांधी यांना सुनावले खडेबोल
आडवाणींबाबतच्या वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी राहुल गांधी यांना सुनावले खडेबोल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहु....

Read more