By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी लोकसभा निवडणूकीतून मनसेने माघार घेतली असली तरी विधानसभेच्या दृष्टीकोनातून पक्षाची जोरदार हालचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून गुरूवारी अमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. ठाणे-पालघर या भागात हजारोंच्या संख्येने विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिका-यांनी मनसेमध्ये कृष्णकुंज या निवासस्थानी राज यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दिवा, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार येथील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला. मनसेच्या या नव्या खेळीमध्ये मनसे हा राजकारणातील तगडा चेहरा नसला तरी युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज दिसून येते. यावेळी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ‘यंदाची निवडणूक ही मोदी विरुद्ध देश असेल’ असा पवित्रा घेतलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोदी विरोधी प्रचाराचे आदेश दिले आहेत. यानंतर मनसे-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. कधी व्यासपीठावरून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे-भाजप एकमेकांवर निशाणा साधत आहे.
“मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र कुणी उमेदवारीच देत नाही” अ....
अधिक वाचा