By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 06:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांनी जेरमी हंट यांचा पराभव केल्याचे कळते. त्यामुळे बोरिस हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. या निकालानंतर थेरेसा मे 'हाऊस ऑफ कोमन्स' ला संबोधित करतील त्यानंतर बकिंगहॅम पॅलेस येथे जाऊन राणी एलिझाबेथ यांच्याकडे राजीनामा देतील. त्यानंतर ब्रिटनच्या राणी नव्या पंतप्रधानांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झालेले बोरिस जॉन्सन 55 वर्षाचे आहेत. महत्वाकांक्षी पण बेभरवशाचा राजकीय नेता अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत प्रशासनातील अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जॉन्सन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी ब्रेक्झिट चा तिढा सोडवेन आणि देशाला अखंड ठेवेन.
वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्या विरोधात वंचितचेच एक न....
अधिक वाचा