By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जम्मू-काश्मीरविषयीचा कोणताही मुद्दा असला तरी तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे असतानाही तेथील कलम 370 हटवल्यामुळे जगातील प्रमुख देश अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर ब्रिटनच्या संसदेत एक चिंता व्यक्त करण्यात आली. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी स्वतः या प्रकरणावरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या दृष्टीकोनातून ब्रिटनने या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली, तसेच सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आलं आहे
भारत सरकारच्या निर्णयावरून ब्रिटनच्या संसदेत चर्चा करण्यात आली. तेव्हा संसदेच्या काही सदस्यांनी यावर चिंता व्यक्त केली. तर काही सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. काश्मीर मुद्द्यावर असणाऱ्या स्थितीवर ब्रिटन लक्ष ठेवून आहे असे डॉमनिक राब यांनी सांगितले
भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले. या निर्णयाचे पडसा....
अधिक वाचा