ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CAA मुळे प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

CAA मुळे  प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे

शहर : मुंबई

            राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर सुधारित नागरिकत्व कायदा हा देशाला बळ देणारा कायदा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. जगातल्या १८७ देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको? CAA ला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध दर्शवत आहेत ही बाब आश्चर्यकारक आहे असंही भिडे यांनी स्पष्ट केलं.

             मतस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात आहे.त्याचा फायदा घेऊन काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवत आहेत. हा विरोध मतलबी आहे असाही आरोप संभाजी भिडे यांनी केला. सध्याच्या घडीला जी माणसं स्वतःला शिकलेली म्हणवतात तीच माणसं या कायद्याच्या बाबतीत अनेकांची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे तर मुस्लीम समाजाकडून अपेक्षा काय ठेवायची? असाही प्रश्न संभाजी भिडे यांनी विचारला.


              चार दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केलं होतं. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

मागे

अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार
अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार

            मुंबई - अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांमुळे आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली- हेमंत सोरेन
शरद पवारांमुळे आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली- हेमंत सोरेन

          नवी दिल्ली - आम्हाला शरद पवारांमुळे लढण्याची प्रेरणा मिळाली, अ....

Read more