ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी देशातील जवळपास २२ छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. त्यासाठी हे राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या राजकीय पक्षांची मागणी फेटाळून लावली. दरम्यान, याबाबत ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, कारण त्यात रिसीव्ह आणि ट्रान्समिट करण्याची यंत्रणा नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्याचवेळी मात्र, त्यांनी नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रात फेरफार करून अशी यंत्रणा बसवलीय का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.व्हीएम मशिनबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रात फेरफार करून अशी यंत्रणा बसवलीय का? निवडणूक यंत्रणाबाबत संशय निर्माण झाल्याने व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी केली जातेय. आज निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

देशात भाजपच्या १०० पेक्षा जास्त जागा कमी होतील. महाराष्ट्रात आघाडीची परिस्थिती चांगली राहील आघाडीच्या जागा मागच्या पेक्षा वाढतील, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा थोडाफार फटका आघाडीला बसू शकतो, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मागे

पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल
पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल

उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून ....

अधिक वाचा

पुढे  

Election results 2019 : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत २३ हजार मतांनी आघाडीवर
Election results 2019 : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत २३ हजार मतांनी आघाडीवर

शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलि....

Read more