By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील जवळपास १० हजार अनोळखी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. १५ डिसेंबरला विद्यापीठ परिसरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन झालं होतं. त्यावेळी उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे मुझफ्फरनगरमध्ये एका आठवड्यानंतर शनिवारी इंटरनेटवरील बंदी हटवण्यात आली आहे.
नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात विविध संस्था, संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अलीगढ मुस्लीम विद्यापीठ परिसरात १५ डिसेंबरला आंदोलन झालं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली होती. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, असा आरोप विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष सलमान इम्तियाज यानं केला होता.
त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला होता. 'विद्यापीठाचं प्रवेशद्वार कोणत्याही सुरक्षा यंत्रणेकडून तोडण्यात आलेलं नाही असं आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. या व्हिडिओतून ते स्पष्ट होत आहे,' असं त्यात म्हटलं होतं.
एएमयू कॅम्पसमध्ये १५ डिसेंबरला झालेल्या हिंसाचाराच्या या व्हिडिओत शेकडोंच्या संख्येनं आंदोलक प्रवेशद्वाराच्या दिशेने येताना दिसले. प्रवेशद्वार तोडतानाही ते दिसले होते. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद केलं होतं. मात्र, प्रवेशद्वारावरील आंदोलक अधिक आक्रमक झालेले दिसले.
Police appealing for order and warning the unlawful assembly. Some policemen received injuries in stone pelting. To control the situation, police had to resort to tear gas munitions.
— UP POLICE (@Uppolice) December 15, 2019
Situation is under control.@ndtv @News18UP @ANINewsUP @htTweets #AligarhMuslimUniversity pic.twitter.com/2BQDARAfm2
व्हिडिओमध्ये जे दिसत आहे, त्यातून सत्य समोर आलंय. आम्ही सु्प्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. विद्यार्थी खूपच आक्रमक होते आणि त्यांनी जाणूनबुजून तणाव निर्माण केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी काही प्रमाणात बळाचा वापर केला. हे प्रकरण कोर्टात आहे, अशी माहिती अलीगढचे पोलीस उपअधीक्षक आकाश कुलहरी यांनी दिली.
पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेलेल्या 'जामिया मिलिया इस्लामिया' आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांप्रति एकजूट दाखवण्यासाठी २५ डिसेंबरला कॅम्पसमध्ये कँडल मार्च काढण्यात आला होता. त्या दरम्यान १२०० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले होते. बंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नवी दिल्ली - नव्या वर्षात १५ जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार&....
अधिक वाचा