ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...',पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...',पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

शहर : देश

नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी  करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय वाल्मिकी विमानतळाचं उद्घाटन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं आहे. मोदींनी हिरवा झेंडा दाखवून देशाला 8 ट्रेनची भेट दिली आहे. अयोध्या धाम जंक्शन आणि अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले Narendra Modi?

आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मी 140 कोटी देशवासियांना प्रार्थना करत आहे की, 22 जानेवारीला जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान आहेत, तेव्हा त्यांनी घरोघरी श्री रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे. 22 जानेवारीची संध्याकाळ भारतभर उजळून निघावी. त्या दिवशी अयोध्येला येणं शक्य नाही. अयोध्येला पोहोचणं सर्वांनाच अवघड आहे. हात जोडून नमस्कार करून, सर्व रामभक्तांना विनंती आहे की 22 जानेवारीला म्हणजे 23 जानेवारीनंतर औपचारिक कार्यक्रम झाल्यावर अयोध्येत यावं. 22 जानेवारीला अयोध्येला यायचं ठरवू नका. आम्ही रामभक्त प्रभू रामाला कधीच त्रास देऊ शकत नाही. 550 वर्षे वाट पाहिली. अजून काही दिवस थांबा, असं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलंय.

दरम्यान, वाल्मिकी विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यात उज्ज्वला लाभार्थीच्या घरी जाऊन त्यांच्या घरी चहा घेतला.

 

 

Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे |

 

पुढे  

धक्कादायक! महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातच्या दिशेला?
धक्कादायक! महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातच्या दिशेला?

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच....

Read more