ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात तिथे मी सीनियर प्रोफेसर होतो,भुजबळ यांचा गायकवाड यांना दोनच शब्दात इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2024 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात तिथे मी सीनियर प्रोफेसर होतो,भुजबळ यांचा गायकवाड यांना दोनच शब्दात इशारा

शहर : मुंबई

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो ' अशा शब्दांत भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना टोला लगावला.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करत त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ गायकवाडांची भाषा योग्य नाही. पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो ‘ अशा शब्दांत भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला.

नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतला. ‘ गायकवाड जे बोलले ते मी ऐकलं, ते ऐकून मलाही वाईट वाटलं. त्यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. मला त्यांना फक्त एवढंच सांगायचय, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजेअशा शब्दांत त्यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला.

राहता राहिला त्यांनी वापरलेल्या भाषेचा प्रश्न तर त्याबद्दल त्यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे, ते बघून घेतील. कमरेत लाथ घालून मला बाहेर काढा, अशी भाषा त्यांनी वापरली. मला मंत्रीमंडळात घ्यायचं की नाही बाहेर काढायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्य आहे.

दुसरी जी गोष्ट आहे कमरेथ लाथ घालण्याची , ते काही ते करणार नाहीत, कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरू आहे आनंद दिघे आणि इतर मोठ्या शिवसेना नेत्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे अशी लाथ-बिथ घालणं, अशा प्रकारची भाषा करणं, हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतंअसं छगन भुजबळांनी सुनावलं.

काय म्हणाले संजय गायकवाड ?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले होते. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरन बरीच खळबळ माजली. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.

मला कोणत्याही पदाची हौस नाही

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावरही भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंमला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. मला आता नवीन काही पाहिजे, असं काही नाही. असं कोणतही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

मागे

महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर
महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर

महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर अस....

अधिक वाचा

पुढे  

दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?
दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?

कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही असा दावा करतानाच दक्षिण भारता....

Read more