By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिक - मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेचा एक नवा नमुना पाहायला मिळालाय. चक्क शिवसेना - काँग्रेस आणि भाजपनं हातमिळवणी करत सत्ता स्थापन केलीय. काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड करण्यात आलीय तर उपमहापौर पदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झालीय.
मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीकडून ताहेरा शेख यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. ताहेरा शेख यांनी महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांचा २१ मतांनी पराभव केला.इथं, महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपनं काँग्रेस-शिवसेना आघाडीला साथ दिलीय. ताहेरा शेख यांना ५१ तर शान-ए-हिंद निहाल अहमद यांना ३२ मतं मिळाली.
मुंबई - महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची अखेर प्रतीक्षा संपल....
अधिक वाचा