ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून केलं मतदान...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून केलं मतदान...

शहर : यवतमाळ

 चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून मतदान केलं... काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केलय. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वरोरा येथील लोकमान्य ज्युनियर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांक १६८ वर काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर सकाळी ७.१५ वाजता मतदान करण्यासाठी गेले. माञ, या केंद्रावर ते येण्यापूर्वीच काही मतदार रांगेत उभे होते. तर, धानोरकर यांनी थेट मतदान अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदान केले. यामुळे रांगेतील काही मतदारांनी नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात धानोरकर यांना विचारले असता, आपण रांग तोडून मतदान केले नसून रांगेतील समोरील मतदारांनीच आपल्याला प्रथम मदतान करण्यास सांगितल्यामुळे आपण रांगेत न लागता मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

मागे

लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीत २७ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत.
लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीत २७ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छ....

अधिक वाचा

पुढे  

चक्क नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का
चक्क नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली असून. यातच ....

Read more