By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वायएसआरपीच्या विरोधात 'चलो अत्माकुर'च आवाहन करण्यात आल होत. तथापि, ही रॅली काढण्यापूर्वी टिडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, त्यांचे पुत्र नारा लोकेश, यांच्यासह माजी मंत्री पी. फुल्लराव, नक्का आनंद बाबू, ए.राजा, सिद्धराघव राव, देवीननी उमामाहेश्वर राव, आमदार एम गिरी, जी. राम मोहन, माजी आमदार बोंडा उमा, आमदार वाय.व्ही. बी. राजेंद्र प्रसाद, देवीनेणी अविनाश आदि नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
चंद्राबाबू नायडू व त्यांच्या मुलाला अमरावती येथील निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान चंद्राबाबू नाडू यांनी सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ घरातच आज सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत उपोषण सुरू केले आहे.
मुख्यमंत्री जगन रेडी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात टीडीपीने ही रॅली आयोजित केली होती. तथापि, या रॅलीला आणि त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील टीडीपीचे नेते रॅली काढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना नजर कैदेत ठेवले असल्याचे कळते.
मुंबईतील रस्ते आणि त्यापाठोपाठ त्यातील खड्डे हा विषय आजरोजीचा नाही. मात्र ....
अधिक वाचा