ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली - चंद्रकांत पाटील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली - चंद्रकांत पाटील

शहर : मुंबई

'२४ ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना महायुतीला जनतेने जनादेश दिला. पण शिवसेनेने भाजपसोबत येण्यास नकार दिलाचर्चा करता आमच्यासाठी सर्व मार्ग खुले आहेत असं म्हटलं. २९ ऑक्टोबरची बैठक शिवसेनेने रद्द केली. मातोश्रीवरुन सिल्व्हर ओकला जायला तयार आहेत. पण भाजपसोबत चर्चा केली नाही. आम्ही मातोश्रींची गरिमा राखली. भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे. पण त्यांना हॉटेलमध्ये जावं लागलं.'संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असं म्हणत संजय राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

'जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. पहिल्या दिवसापासूनत अडीच वर्ष-अडीच वर्ष नावाचा विषय सुरु केला. बसून चर्चा केली नाही. पहिल्यास पत्रकार परिषदेत आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. असं म्हटलं. राष्ट्रवादीला भेटायला वेळ होता. पण भाजपला भेटण्यास वेळ नव्हता.'

'शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रेम वाढत गेलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. महाशिवआघाडीतला शिव सोडला. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सोडली. उद्धवजी संजय राऊत यांना आवरत नाही. पाठित खंजीर खुपसण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एकदाही चर्चा केली नाही. संजय राऊत यांनी शिवसेनेची आणि महाराष्ट्राची वाट लावली.' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

मागे

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारण....

अधिक वाचा

पुढे  

सुप्रिया सुळेंची व्हॉट्सऍप स्टेटसवर भावूक प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंची व्हॉट्सऍप स्टेटसवर भावूक प्रतिक्रिया

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे भावूक झाल....

Read more