ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील

शहर : मुंबई

“राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे.

राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे

“अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला

 

मागे

बिहारमध्ये आज शेवटची लढाई; मतदानाला सुरुवात; नवा रेकॉर्ड बनवण्याचे पीएम मोदींचे आवाहन
बिहारमध्ये आज शेवटची लढाई; मतदानाला सुरुवात; नवा रेकॉर्ड बनवण्याचे पीएम मोदींचे आवाहन

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (BIHAR ASSEMBLY ELECT....

अधिक वाचा

पुढे  

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!
जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या र....

Read more