ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १ कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १ कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी

शहर : मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार हर्बल न्युट्रिशन कंपनीने तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी उपलब्ध करून दिला आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे संचालक हरिश पंतनेहा सिंगके.एम. सौम्या आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1600 माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यापैकी 1200 माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यात आला असून यातील काही तलावांचे काम करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून दिला आहे.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे साधारणत: 1200 शेतकऱ्यांना लाभ होणार असून यामुळे कृषी विकास आणि मत्स्यव्यवसायाला चालना मिळेलअसा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. हर्बल न्युट्रिशन कंपनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून राष्ट्र उभारणीच्या कामात देत असलेल्या योगदानाबद्दल वित्तमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांसाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

हर्बल  न्युट्रीशन  कंपनी ही 96 देशात कृषीसिंचनपशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी काम करते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कृषी सिंचाई योजनेत व महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण कार्यक्रमात यानिमित्ताने सहभागी होता येत असल्याचा आम्हाला अभिमान आहेयातून राष्ट्र हिताचे काम होत आहे,  असे या कंपनीचे भारतातील प्रमुख अजय खन्ना यांनी म्हटले आहे.

मालगुजरी तलाव

मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमिनदारांनी लोकसहभागातुनसिंचनासाठी तयार केलेले तलाव. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे.या तलावांतुन पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे.तसेच यामुळे त्या परीसरातील विहीरींच्या पाण्याच्या पातळीतदेखील वाढ होत असे.

महाराष्ट्र राज्यात नागपूर,भंडारा,चंद्रपुर   गोंदिया जिल्ह्यात असे सुमारे 7000 तलाव आहेत.हे तलाव सुमारे 200 ते 300 वर्षे जुने आहेत.

 

 

मागे

शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाइन फ्लू ने निधन
शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाइन फ्लू ने निधन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांच....

अधिक वाचा

पुढे  

कुठे आहेत खड्डे ? मुंबईत खड्डे अंह.
कुठे आहेत खड्डे ? मुंबईत खड्डे अंह.

मुंबईतील रस्ते आणि त्यापाठोपाठ त्यातील खड्डे हा विषय आजरोजीचा नाही. मात्र ....

Read more